लेखन कौशल्य दाखवा आणि मिळवा छान छान बक्षिसे .
सायास पब्लिकेशन आणि आपुलकी चॅरिटेबल ट्रस्ट नांदेड यांच्या वतीने यंदा शब्दसंवाद साहित्य लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे

सायास पब्लिकेशन आणि आपुलकी चॅरिटेबल ट्रस्ट नांदेड यांच्या वतीने यावर्षीपासून दिवाळी निमित्त युवा कथालेखन व काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ही स्पर्धा सर्व नवोदित मराठी साहित्यिकांसाठी खुली असून त्यांनी आपले लेखन खालील नियम व अटीनुसार दि. ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत पाठवावी. स्पर्धेतील विजेत्यांचे लेखन हे ‘कुळवाडी’ दिवाळी अंकातून प्रसिद्ध केले जाईल.
साहित्य लेखन स्पर्धेचे नियम व अटी –
- आपली कथा / कविता ही स्वलिखित व अप्रकाशित असावी. (तसे शपथपत्र सोबत जोडावे.)
- कथेसाठी शब्दमर्यादा १५०० शब्द तर कवितेसाठी शब्दमर्यादा १५० शब्द आहे
- आपली कथा / कविता ही केवळ मराठी भाषेतच असावी..
- दि. ३० सप्टेंबर १९९३ नंतर जन्म झालेल्या साहित्यिकांनाच या स्पर्धेत सहभागी होता येईल.(यासाठी वयाचा दाखला जोडणे आवश्यक आहे.)
- परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
- आपली कथा / कविता दि. ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत दिलेल्या ई मेल वर व त्याची मुद्रित प्रत सोबत दिलेल्या पत्त्यावर पाठवावी.

पारितोषिक –
● प्रथम : ₹१०००/- व प्रमाणपत्र
● द्वितीय : ₹७००/- व प्रमाणपत्र
● तृतीय : ₹४००/- व प्रमाणपत्र
साहित्य पाठविण्याचा पत्ता–
संपादक ‘कुळवाडी’ दिवाळी अंक ०६, कुळवाडी, साई नगरी, काबरा नगर जवळ, वाडी (बु.), नांदेड - ४३१ ६०५ ऑनलाईन पाठविण्यासाठी ई मेल sayas.nanded@gmail.com
आपुलकी चॅरिटेबल ट्रस्ट बद्दल –
आपुलकी चॅरिटेबल ट्रस्ट ही नांदेडमधील स्थापन झालेली ना-नफा ना तोटा संस्था आहे, जी शिक्षण, अर्थशास्त्र, समाजकल्याण, कृषी, आरोग्य, साहित्य आणि इतर अनेक क्षेत्रात उत्कृष्टतेला चालना देण्यासाठी समर्पित आहे. ट्रस्टची दृष्टी व्यक्तींना सक्षम करणे, एक मजबूत समाज निर्माण करणे आणि गरजूंना आधार आणि मदत प्रदान करा. दर्जेदार शिक्षण, आर्थिक वाढ, सामाजिक कल्याण, शाश्वत शेती आणि सांस्कृतिक जतन यावर लक्ष केंद्रित करून, आपुलकी चॅरिटेबल ट्रस्ट सर्व क्षेत्रातील लोकांच्या जीवनात अर्थपूर्ण प्रभाव पाडण्यासाठी वचनबद्ध आहे
अश्याच आणखी स्पर्धेच्या माहितीसाठी आम्हाला सोसिअल मीडिया वर फॉलो करायला विसरू नका –
Job Nagari – https://jobnagari.com/